मनस्वी आणि मनोज या वर्षी गुढी त्यांच्या नवीन घरी उभारणार असे त्यांनी ठरवले घरापासून अगदी च हाकेच्या अंतरावर नव्या फ्लॅट चे बुकिंग करून दोन वर्ष झाले होते पण कोरोनामुळे काम लांबणीवर पडले होते या गुढीपाडव्याला गृहप्रवेश करू असे त्यांनी ठरवले होते .,…पाडव्याला अजून एक महिना बाकी होता पण त्यांची धावपळ उत्साहात आजपासूनच चालू झाली होती कारण शनिवार रविवार दोन दिवस दोघांना पण सुट्टी होती सामानाची बांधाबांध करून ते गुढीपाडव्याला गृह प्रवेश करायचे ठरले होते …
मात्र त्यांच्या या निर्णयाने दमयंती ताई आणि अनिलरावांना कसेनुसे झाले पण नाराजी चेहऱ्यावर दाखवत नव्हते ….कारण मनोज त्यांचा एकुलता एक मुलगा होता . त्या मनू या घरात सून म्हणून आल्यापासून तिच्याशी अगदी मुलीप्रमाणे वागत होत्या .. कारण त्यांना मुलीची हौस होती पण त्यांना मनोजनंतर अपत्य च झाले नाही ..
आपली सगळी हौस मौज आपण सून आल्यावर तिच्यातच पूर्ण करू असे त्यांनी मनोमन ठरवले आणि वास्तव स्वीकारले ..मनस्वी पण आईवडिलांची एकुलती एक न लहान भाऊ होता पण हि जास्त लाडकी होती …..लहान कुटुंबातुन या घरात आली होती . तिच्या घरी आई वडील , ती अन एक भाऊ एवढेच माणसे त्याच्या मुळे तिला स्वच्छंदी आयुष्याचीच सवय होती . मनोज आणि ती सोबत इंजिनीरिंग करत होते तेथेच आणि मैत्री नंतर कधी ते प्रेमात पडले त्यांचे त्यांनाच समजले नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघेही वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनी मध्ये जॉईन झाले तेव्हा त्यांना एकमेकांची उणीव भासू लागली न त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली …
दोघांनीही आपआपल्या घरी सांगून आपल्या प्रेमाची कबुली दिली अन दोघांचे थाटामाटात लग्न झाले …नव्याचे नऊ दिवस संपले अन त्यांचा सुखी संसार सुरु झाला … पण स्वछंदी मनस्वी तिला तिच्या सासूबाईंचा जाच वाटू लागला .. त्या काही प्रेमाने समजावून सांगायला लागल्या तरी तिला त्रास व्हायचा .. त्या तिला घर कामात पण मदत करायच्या ती नोकरी करते म्हणून तर तिला त्यांची लुडबुड वाटायची .अगदी हातात डबा द्यायच्या संध्याकाळी पण कणिक मळून ठेवणे , डाळ भातच कुकर लावून ठेवणे , भांडी घासणे अशी घरातील छोटी मोठी कामे करायच्या पण तरी तिला मनासारखे जगता येत नाही असे तिला वाटायचे . मग ती सारखीच मनोजच्या मागे लागून वेगळे राहण्याचा हट्ट धरू लागली … मनोज दोघीमध्ये भरडून निघत होता त्याला पण आपल्या आईबाबांना सोडून दुसरीकडे राहावे वाटत नव्हते … बघता बघता त्यांच्या लग्नाला दोन च वर्ष झाले होते …
पण मनस्वीच्या सुखासाठी त्याने जवळच एक टू BHK फ्लॅट बुक केला पण आईवडिलांना सांगायचे नाही या अटीवर . कदाचित त्याला अशा होती कि तोपर्यंत तिचे मन बदलेल म्हणून पण कसले काय त्यात वाढ च होत होती .
त्याने आठ दिवस आधी च तिथे जाऊन राहावं असे तिला सुचवले ती पण स्वातंत्र्य मिळणार म्हणून खुश होती . मनासारखे सगळे तिला आता करता येणार जे होते … त्यांच्या सुखासाठी दमयंती ताई आणि अनिलराव पण तयार झाले अजून काय करू शकणार होते ते . पहिला दिवस त्यांचा खूप आनंदात गेला हॉटेलवरून जेवण मागवले गेलं , चायनीज खाल्ले, लेट नाईट मूवी पण बघून झाला … पण दुसऱ्या दिवशी जसे दिवस सुरु झाला तसे तिला सासूबाईंची उणीव भासू लागली .. सासरे पण हॉल वगैरे झाडून घेऊन हातभार लावायचे ते तिला आठवलं . आज तिला स्वतःला उठून दोघांचा डबा नास्ता बनवावा लागला , मनोजने मुद्दाम तिला काहीच मदत केली नाही …. रिकामे घर तिला खायला उठले संध्याकाळी पण घरी जो दिवसभर पसारा पडला होता तो तसाच होता .. दोघांचे पण ओले टॉवेल सोफयावर आरामात लोळत होते … कचऱ्याचा वास येत होता.. किचन वर तर सकाळचे भांडे तसेच होते… तिची चिडचिड व्हायला लागली होती . एव्हाना तिला आपल्या वागण्याचा पच्छाताप होऊ लागला …
तिने महिना कसाबसा काढला …. गुढीपाडव्याला सासू सासरे नवीन घरी येणार होते कारण गुढी पाडव्याची पूजा नवीन घरी एकत्र करायची असे ठरले होते . त्यांना पण पोरं घरात नाही तर घर खायला उठले होते पण त्यांनी वास्तव स्वीकारले ती पण मस्त साडी नेसून तयार झाली सासूबाई आल्यावर दोघीनी मिळून पुरणपोळी बनवली … गुढीला नैवद्य दाखवला अन जेवण करून सासूसासरे जायला निघालेआणि दारात पाऊल टाकणार इतक्यात मनस्वीने आवाज दिला न त्या जागीच थांबल्या ….
“आई झाले गेले विसरून जाऊ अन सोबत राहू तुम्ही दोघे पण आमच्यासोबत राहायला या तुमचाही हक्क आहे इथे “…
मग मनोज मनातून हसत बोलला , ” खरेच इथे या तुम्ही आपण सोबत राहू .”
इतक्यात दमयंतीताई बोलल्या , ” तुमच्या नव्या संसारात आमची लुडबुड नको आम्ही अधून मधून येत जाऊ , अन बर का आपण सण सोबत साजरे करू , काही लागले तर आम्ही आहोतच कि तुम्ही दोघेच आनंदाने राहा ”
“नातवंड आल्यावर येऊच कि कायमचे तुमच्याकडे , आम्हाला हि तुमच्याशिवाय कोण आहे ? ” सासरे बोलले तशी मनस्वी लाजली … इतके बोलून सगळ्यांनी उभारलेल्या गुढीला मनोभावे नमस्कार केला हि नात्यांची वीण घट्ट करणारी गुढी सगळ्यांच्या मनात राहिली ती कायमची …
का म्हणून काय विचारताय लवकरच त्यांच्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल लागली …..
मिनाक्षी काकडे
कथा पूर्णतः काल्पनिक आहे कथा आवडल्यास लाइक आणि कमेंट जरूर करा
धन्यवाद
कथा आवडल्यास लाईक नक्की करा न कमेंट करायला विसरू नका . अशाच आणखी कथांसाठी संवाद मराठी या फेसबुक पेज ला लाईक करा