” काका उद्या माझा वाढदिवस आणि तुम्हीच येणार नाहीत का ???? शिवाय तुम्ही नमितला घेऊन येणार होतात ” अमृता लटक्या रागात विनायकरावांशी बोलत होती ……
” आमच्या अमुचा वाढदिवस अन आम्ही येणार नाही असे होईल का ???? पण उद्या तुझ्या काकूला घेऊन शहराच्या मोठ्या दवाखान्यात जायचय म्हणून समजून घे बाळा “विनायकराव अमृतापुढे वाकून बोलत होते……
पण त्याने अमृताचे समाधान झाले नाही तिच्या बालसुलभ मनाला हेच समजत नव्हते कि फक्त दाखवून आणायचे आहे दवाखाण्यात तर जायचेच कशाला ??? पण तिला माहित नव्हते कि तिच्या काकूला कँसर झालाय आणि त्याच्या उपचारासाठी मोठ्या दवाखाण्यात जाणेच गरजेचे होते .नव्वदी च्या दशकांत गावी दवाखानेच नव्हते … विनायकराव अमृताच्या बाबांचे खास मित्र तालुक्याला राहायचे …
अमृता लहानपानपासून हुशार आणि चुणचुणीत होती त्यामुळे विनायकरावांना ती खूप आवडायची त्यात तिला आई नव्हती …. आणि विनायकरावांना हि मुलीची हौस होती पण त्यांना मोठा अजित आणि धाकटा नमित अशी दोन्ही मुलेच होती …नमित आणि अमृता यांची चांगली गट्टी जमली होती त्यांच्यात एकच वर्षाचे अंतर होते नमित अमृतापेक्षा एक वर्षांनी मोठा होता …. . त्यात अमृता कायम बाबांसोबत तालुक्याला जायची त्यामुळे तिचा खूप लळा होता …. अमृताची आई अमृता या जगात आली अन हे जग सोडून गेली ….
तिच्या बाबानी दुसरे लग्न काही केले नाही कारण दुसरी बायको आपल्या अमृताचा छळ करेन असे अमृताच्या बाबाना वाटायचे ….. त्यामुळे अमृताचे बाबा त्यांच्या लहान भावासोबत राहत होते …. आणि अमृताचा सहावा वाढदिवस होता त्यामुळे तिच्यासाठी परकर पोलके आणायला ते तालुक्याच्या गावाला आले होते आणि विनायकरावांच्या घरी थांबले होते कारण तेव्हा बस किंवा गाडीची सोय नव्हती …. काहीच श्रीमन्त लोकांकडे राजदूत गाडी असायची… मग विनायकरावानी तिची समजूत घालण्यासाठी तिला लाकडाच्या फळीचा झोका वाढदिवसाला गिफ्ट म्हणून बनवून घेतला कारागीराकडून …. मग तिची काकूही तिला मायेने जवळ घेऊन बोलली ,”आपण अमुचा वाढदिवस झाल्यावर दुसऱ्या दिवशी निघू शहराला आईविना पोर मला तिला दुखी बघून जात येणार नाही एका दिवसाने असा काय फरक पडणार आहे …. तसे तर काय फरक पडणार आहे दवाखाण्यात जाऊन पण तुम्ही गळ घालताय म्हणून येतेय … मला अमुच्या आईसारखेच आधीच सगळे सोडून जावा लागणार … “
त्यावर विनायकराव काकूला बोलले ,” हो ग तारा तुला बोलायला काय जातेय तू पण माझ्या मुलांना अमुसारखे अनाथ करून जाणार का ,??मला प्रयत्न तर करू दे “
विनायकराव आपले अश्रू लपवत बोलले कितीही झाले तरी त्यांचे त्यांच्या बायकोवर खूप प्रेम होते पण तेव्हा आतासारखे उघड उघड बोलून दाखवत नव्हते पण एकेमकांबद्दल प्रेम आणि आदर खूप होता …. विनायकरावचें वडील साप चावून मेल्यानंतर त्यांना हि बायकोमुलांशिवाय कोण होते आई तर दमेकरी होती त्याने ती लवकर गेली तेव्हा ना कसले दवाखाने ना डॉकटर त्यामुळे बाबाच्या नदी लागून त्यांच्या वडिलांनी उपाय केला अंगाऱ्या धूपाऱ्याचा तर त्याच्या धुराने ती कळवळत होती पण तिकडे कोणी लक्ष दिले नव्हते …. छोटा विनायक जवळून हे सगळे बघत होता …. त्यामुळे आपल्या बायकोला आज त्यांनी जमिनीचा एक तुकडा सावकाराकडे गहाण ठेऊन मोठ्या दवाखाण्यात न्यायचा प्रबंध केला ….
अमृताचा वाढदिवस झाल्यावर ते आपल्या बायकोला घेऊन शहरात गेले तपासण्या केल्या पण काही फरक नाही पडला मग घरी च आपल्या बायकोची सेवा करू लागले …. अमृता आणि तिचे बाबा कधीमधी येऊन भेटून जात …
असेच दिवस जात होते पण त्यांच्यात काही सुधारणा नव्हती … त्यांनी तर अंथरुनच धरले …. त्यामुळे सगळे विनायकारवाना करावे लागत होते ,ते तालुक्याच्या शाळेवर शिकवत पण आता त्यांना घरी च राहावे लागायचे आपल्या बायकोची काळजी घ्यायला …. तर अमृताच्या घरी तिचे काका काकू धुसफूस करत असायचे कारण त्यांना अमृता आणि तिचे बाबा म्हणजे त्यांच्यावर असलेले जबाबदारीचे ओझे वाटायचे … तरी अमृता घरकामात मदत करायची जमेल तेवढे काम करायची …. पण तिची काकू आईविना पोर म्हणून जवळ घायचा ऐवजी दूर लोटायची पण अमृताने कधी तोंडून शब्द काढला नाही …. सरपण गोळा करून आणणे , गोवऱ्या थापणे , धुनी भांडी करणे यातच तिला गुंतुवून ठेवले … तिला शाळेत जाऊन च दिले नाही त्यामुळे ती शिकू शकली नाही ….. तिच्या काळजीने तिचे बाबा गणपतराव पण खंगून चालले होते … ते आपल्या मित्राला आपली कर्मकहाणी सांगायचे तर विनायकराव त्यांना बोलायचे इकडे येऊन राहा आपण दोघे मिळून शेती करू आणि राहू पण त्यांना ते पटायचे नाही कारण ते स्वाभिमानी होते खूप ….
त्यातच विनायकरावांच्या पत्नी ताराबाई हे जग सोडून गेल्या …. आणि अजित आणि धाकटा नमित दोघेही अनाथ झाले … मग मात्र विनायकरावानी गणपतरावांना इकडे येण्याची गळ घातली एकत्र नाही तर निदान शेजारी शेजारी राहू असे सुचवले हे मात्र त्यांना पटले मग त्यांनी शेतातच वेगवेगळे घरे बांधून राहू लागली …. त्यांना सुखाचे दिवस येतात असे वाटत असतानाच एके दिवशी शेतात गेलेला अजित पाय घसरून विहिरीत पडला त्याला पोहता येत नसल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि पुन्हा दोन्ही घरे दुःखात बुडाली …. मग अमृता जमेल तस स्वैपाक करून विनायकराव आणि गणपतराव याना जेऊ घालायची … आणि नमित ची समजूत घालायची … एकमेकांसोबत खेळलेले, भांडण रुसवा फुगवा केलेले दोघे आज नियतीने वेगळे केले होते म्हणून अमृता कायम त्याला आपला खांदा द्यायची ….
त्यात नुकतेच वयात आलेले दोघे एकमेकांकडे आकर्षित होत होते … सुख दुःखात एकमेकांना सांभाळून घेत होते…. एकमेकांच्या मिठीत स्पर्शाने बोलत होते त्यात विश्वास आश्वासकता आणि खूप सारे प्रेम दिसून येत होते …. विनायकराव आणि गणपतराव याना पण त्यांचे हळुवार फुलणारे प्रेम दिसत होते …. त्यामुळे ते मनोमन खुश पण होते त्या दोघांसाठी कारण आपल्यानंतर ते एकमेकांना नक्कीच सांभाळून घेतील असा विश्वास त्यांना वाटत होता ….
पण अचानक एक दिवस नमित त्याच्या बाबाना आणि काकांना बोलला कि.,” मला मिलिटरी मध्ये जायचेय …. माझी खूप इच्छा आहे मला देशसेवा करायचीय …. “
त्याच्या या निर्णयाने दोघांनाही धक्का बसला त्यांच्यासाठी नमित हाच एकमेव आधार होता आता या घरासाठी न तोच घरापासून दूर जाऊन देशसेवा करायची म्हणतोय …. त्यात फोन ची सोय नाही तार लिहल्यानंतर कधी पंधरा दिवस तर कधी महिन्यांनी मिळायची मग कसे होणार पण तो आपल्या निर्णयावर ठाम होता त्याला देशसेवाच करायची होती …. त्याच्या या निर्णयाने नम्रताला पण दुःख झाले पण तिने तसे जाणवून न देता त्याला पाठिंबा दिला …
” बाबा – काका त्याची इच्छा आहे तर जाऊ द्या ना त्याला मिलिटरी मध्ये ” मी आहे ना तुम्हाला दोघांना बघायला त्यात तो सहा महिन्यातून सुट्टी पण घेऊन येत जाईल ना , तुम्ही त्याचे मन तोडू नका आता ” नम्रता बोलली …
” अगं पण आम्ही आता वय झाले आमचे न तुम्ही दोघे एकमेकांना पसंत करता ना ?? आम्ही तुमचे लग्न लावून द्यायचा विचार करतोय …. ” विनायकराव बोलले .
तसे दोघांनी एकमेकांकडे पहिले …
मांजर डोळे मिटून दूध पिते मग त्याला वाटते आपल्याला कोणीच बघत नाही , हो ना ??? पण आम्हाला सगळं दिसतेय म्हंटले , आणि आम्हाला चालेल बर ” घसा खाकरून गणपतराव बोलले .
तसे लाजून अमृता आत निघून गेली …. नमित ला पण आनंद झाला पण तो मिलिटरीमध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम होता ….
त्याने तशी तयारीही चालू केली …. इकडे दोघं मित्रांनी आपल्या मुलांच्या लग्नाची तयारी केली आणि त्यांचे लग्न लावून दिले .. सोबतच नमितला मिलिटरी मध्ये जाण्याची पण परवानगी दिली ….
त्यांचा सुखाचा संसार दोघे मित्र आनंदाने बघत होते … लग्नानंतर सहा महिन्यात नमितला तो मिलीटरीमध्ये भरती झाल्याची तार आली …. नमीतला खूप आनंद झाला बाकीच्यांना पण आनंद झाला पण आता तो दूर जाणार या काळजीत पडले सगळे …..
पुढे काय होते तर बघूया पुढील भागात
मिनाक्षी काकडे
कथा काल्पनिक आहे कथा आवडल्यास लाइक आणि कमेंट जरूर करा.
धन्यवाद ….
कथा आवडल्यास लाईक नक्की करा न कमेंट करायला विसरू नका . अशाच आणखी कथांसाठी संवाद मराठी या फेसबुक पेज ला लाईक करा